‘या’ राज्यात पतंग उडवण्यास बंदी, १४४ कलमही लागू

उदयपूर , १४ जानेवारी २०२३ : देशभरात आजपासूनच मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये तर आज सकाळपासूनच पतंगबाजीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, राजस्थानातील उदयपूर येथे मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. तसेच १४४ कलमही लागू करण्यात आले आहे.

उदयपूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रभा गौतम म्हणाल्या, दुचाकी चालकांचा आणि पक्षांचा जीव वाचवण्यासाठी शहरात पतंगबंदी करण्यात आली आहे. कारण या पतंगांच्या मांज्यामध्ये धातूमिश्रीत पदार्थ वापरले जातात.

  • शहरात ३१ जानेवारीपर्यंत निर्बंध कायम

जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी ताराचंद मीना म्हणाल्या की, पतंग उडवण्यासाठी पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, मेटल मांज्याची व्होलसेल आणि रिटेल विक्रीवर बंदी आणण्यासाठी शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ३१ जानेवारीपर्यंत हे निर्बंध शहरात कायम असणार आहेत.

  • तर होणार कारवाई

या नव्या आदेशांनुसार, विशिष्ट वेळेतच इथे पतंग उडवता येणार आहेत. शहरात सकाळी ६ ते ८ या वेळेत आणि संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत पतंग उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. या वेळेत जर कोणी पतंग उडवताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा