Amazon वर 600 चीनी ब्रँडची उत्पादनं विकण्यास बंदी, केलं पॉलिसीचं उल्लंघन

पुणे, 22 सप्टेंबर 2021: Amazonने चीनी ब्रँडवर मोठी कारवाई केली आहे.  Amazonने आपल्या प्लॅटफॉर्मवरून 600 चीनी ब्रँडवर बंदी घातली आहे.  हे चिनी ब्रँड रिव्यू पॉलिसीचं उल्लंघन करत होते.  वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबत वृत्त दिलं आहे. अहवालात असं म्हटलं आहे की Amazon ने सांगितलं की ते ग्राहकांना पॉजिटिव रिव्यू देण्यासाठी गिफ्ट कार्ड ऑफर करत असत.
द व्हर्ज मधील एका अहवालानुसार, काही ब्रँड  VIP टेस्टिंग प्रोग्राम्स ऑफर करत होते.  तर अनेक ब्रँड उत्पादनाची वॉरंटी वाढवण्यासाठी ऑफर करत असत. अहवालात असं म्हटलं आहे की, अनेक ब्रॅण्ड्स ज्यांनी वाईट रिव्ह्यू दिले त्यांना इंसेंटिव द्यायचे.  रिफंड किंवा फ्री प्रोडक्ट इन्सेंटिव्ह म्हणून दिले गेले.  Amazon ने सांगितलं की, यामुळं व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्याची संधी मिळते.  यासाठी निरोगी स्पर्धा असायला हवी.
Amazon ने पुढं सांगितलं की ग्राहक एखादे उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्याचे पॉजिटिव रिव्यू  पाहतो.  यासाठी, कंपनीकडं रिव्यू आणि सेलिंग पार्टनर्स साठी क्लिअर पॉलिसी असते.  जे या पॉलिसीचे पालन करत नाहीत त्यांना सस्पेंड किंवा बॅन केलं जातं.
याशिवाय जे लोक पॉलिसीचे पालन करत नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाते.  या मोहिमेद्वारे चीनला लक्ष्य केले गेले नसल्याचे Amazonने म्हटलं आहे. कंपनीने असं म्हटलं आहे की जर कंपनीचं धोरण पाळलं गेलं नाही तर कंपनी अशी पावलं उचलत राहील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा