दिल्ली: अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे उपाय योजत आहे. मरगळलेली अर्थव्यवस्था सुव्यवस्थित व्हावी म्हणून करांमध्ये मोठ्या प्रमाणावर कटोती करण्यात आली आहे तसेच बँकांच्या व्याजदरांमध्ये ही मोठ्या प्रमाणावर कातोटी करण्यात आली आहे जेणेकरून अर्थव्यवस्थेमध्ये पैसा यावा व अर्थव्यवस्थेला चालना मिळावी.
मरगळलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी तसेच बांधकाम क्षेत्राला आलेली मरगळ झटकण्यासाठी काल संध्याकाळी केंद्र सरकारने तब्बल पंचवीस हजार कोटींचे बेल आऊट पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये केंद्र सरकारचे दहा हजार कोटी असतील तर एलआयसी हाऊसिंग आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ही रक्कम उभी करण्यात येणार आहे. काल रात्री अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या निर्णयाची घोषणा केली.