बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या कमरेला आला रिव्हॉल्व्हर ऐवजी सॅनिटायझर

नाशिक, दि.२९मे २०२०: सध्या नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार काही ठराविक ठिकाणी वाढला आहे. यात मालेगावनंतर आता शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस बांधवांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यात ग्रामीण पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलातील जवानांचा समावेश होता.

शहरातील कोरोना बंदोबस्तासाठी प्रत्यक्ष मैदानात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःची आणि सोबत असलेल्या अधिकाऱ्यांची कोरोनापासून दूर राहण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे.

एरवी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या सोबतीला काम करतांना पोलीस कर्मचारी आपल्या कंबरेला सर्व्हिस रिव्हॉल्वर लावून काम करत असतात. मात्र याच सर्व्हिस रिव्हॉल्वरची जागा आता सॅनिटायझरने घेतली आहे. या गोष्टीची सध्या नाशिक जिल्ह्यात चर्चा आहे. सॅनिटायझर सर्वाना देऊन त्यांचे प्रबोधन करणे सोपे जात आहे. पोलिसांच्या या उपक्रमाची सध्या चर्चा आहे.

सहायक पोलिस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा कंबरेला सर्व्हिस रिव्हॉल्वर ऐवजी सॅनिटायझर दिसू लागले आहे. आपले कर्तव्य पार पाडताना कोणालाही नकळत कोरोनाची लागण होऊ शकते म्हणून ही काळजी.

कोरोनाशी लढा देतांना तोंडाला मास्क, सुरक्षित अंतर आणि याच दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून हाताला वारंवार सॅनिटायझर लावणे हे कधीही फायद्याचे ठरू शकते हे सुद्धा तितकच खरं आहे. यामुळे पोलिसांना आपल्या आरोग्याची काळजी घेणे सोपे जाणार असून इतरांना मागर्दशन करण्यासाठीही फायद्याचे ठरणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी :

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा