बांगलादेशचे भारताला २७२ धावांचे लक्ष्य; मेहदी हसनचे नाबाद शतक

पुणे, ता. ७ डिसेंबर २०२२ : भारत आणि बांगलादेश संघांदरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर सुरू आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बांगलादेशने मेहदी हसन मिराजच्या नाबाद शतकाच्या जोरावर ७ बाद २७१ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी २७१ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेश संघाला पहिला धक्का मोहम्मद सिराजने दिला. त्याने दुसऱ्या षटकातच सलामीवीर अनामुल हकला पायचित केले. अनामुलने ९ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने ११ धावा केल्या. त्याच्यानंतर लिटन दास (७) आणि नजमुल हुसेन शांतो (२१) बाद झाले. यानंतर ही बांगलादेशची पडझड सुरूच होती. त्यामुळे बांगलादेशने १८.६ षटकांनंतर ६ बाद ६९ धावा केल्या होत्या.

महमुदुल्ला-मेहदी हसन मिराजची शतकी भागीदारी
दरम्यान, महमुदुल्ला आणि मागील सामन्यातील हिरो मेहदी हसन मिराजने डाव सावरण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. सातव्या विकेटसाठी विक्रमी १४८ धावांची भागीदारी करीत त्यांनी हे सिद्धही करून दाखवले. ज्यामुळे बांगलादेश संघ मजबूत स्थिती पोचला. यानंतर महमुदुल्ला ७७ धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्याने आपल्या ९६ चेंडूंच्या खेळीत ७ चौकार फटकावले. त्याला बाद करून उमरान मलिकने त्यांची भागीदारी मोडीत काढली.

पुन्हा डावाची सूत्रे आपल्या हाती घेताना शानदार शतक झळकावले. त्याने ८३ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०० केल्या. त्यामुळे बांगलादेशचा संघ २५० धावांचा टप्पा पार करू शकला. ज्यामुळे बांगलादेश संघाने ७ बाद २७१ धावा केल्या आहेत.

भारताला विजयासाठी २७२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारताकडून गोलंदाजी करताना फिरकीपटू वाशिंग्टन सुंदरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्या मोबदल्यात फक्त ३७ धावा दिल्या. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि उमरान मलिकने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. दोघांनी अनुक्रमे ४७ आणि ५८ धावा दिल्या.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा