उदगीर, २२ फेब्रुवारी २०२३ : बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उदगीर शहरात आज भव्य मिरवणूक काढण्यात आली. रथावरून श्री संत सेवालाल महाराज यांची ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्याच्या अतिशबाजीत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत बंजारा समाजाच्या चालीरीती, रूढी परंपरा, संस्कृती वेशभूषा पाहायला मिळाल्या. ही मिरवणूक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा, डॉ झाकीर हुसेन चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जय जवान चौक, महात्मा बसवेश्वर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कॅप्टन कृष्णकांत चौक, नाईक चौक येथून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत बंजारा महिला व बंजारा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी हलगीच्या तालावर बंजारा महिलांनी पारंपरिक नृत्य सादर केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सुधाकर नाईक