बँकांनी सावध राहा: शक्तीकांत दास

मुंबई रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी बँकांना सांगितले की सध्याची आर्थिक परिस्थिती त्यांच्यापुढे काही आव्हाने उभी करू शकते, म्हणून बँकांनी त्यांना पूर्ण जोमाने सामोरे जाण्यास तयार असले पाहिजे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांशी बोलताना दास यांनी बँकिंग क्षेत्र सुधारत आहे व अजूनही मजबूत असल्याचे नमूद केले. मुंबई रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी बँकांना सांगितले की सध्याची आर्थिक परिस्थिती त्यांच्यापुढे काही आव्हाने उभी करू शकते, म्हणून बँकांनी त्यांना पूर्ण जोमाने सामोरे जाण्यास तयार असले पाहिजे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांशी बोलताना दास यांनी बँकिंग क्षेत्र सुधारत आहे व अजूनही मजबूत असल्याचे नमूद केले.
आरबीआयने प्रसिद्धी पत्रकात दास यांच्या माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यामते, सध्या आर्थिक परिस्थिती बेताची आहे. बँकांनी थकीत कर्जे कमी करण्याच्यादृष्टीने तातडीने कामाला लागावे. जीडीपी दरात होणारी घसरण चिंता वाढवणारी आहे. अशा कठीण परिस्थिती बँकांनी सर्व संकटांचा सामना करण्यासाठी सुसज्ज राहावे, असे दास यांनी म्हटले आहे. दास यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांशी आर्थिक स्थितीबाबत चर्चा केली. सार्वजनिक बँका थकीत कर्जांशी सामना करताना मेटाकुटीला आल्या आलेत. अशा स्थितीत खुद्द गर्व्हनरांनी आर्थिक आरिष्ट्याचे संकेत दिल्याने बँकिंग व्यवस्थेवरील संकट गडद होण्याची शक्यता आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा