मुंबई: बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार बचत खात्यात पैसे भरणं, आणि पैसे काढण्यासाठी आतापर्यंत कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. एटीएममधून केल्या जाणाऱ्या ट्रान्झाक्शनवरही किरकोळ दंड आकारण्यात येत होता. मात्र आता बँकेचे नियम बदलण्यात आले असून चार्ज लावण्यात येणार आहे. त्यामुळे बदलेल्या नियमांची माहिती नसल्यास तुम्हाला भुर्दंड भरावा लागू शकतो.
आजपासून आयसीआयसीआय बँक बचत खात्याच्या काही नियमांमध्ये बदल करणार आहे. तुम्हाला जर हे बदलेले नियम माहीत नसतील तर तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. ICICI बँकेच्या बदलेल्या नियमानुसार आजपासून बचत खातं आणि एटीएम सेवेसाठी बँकेकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.