बँकिंग अधिनियम सुधारणा विधेयक २०२० काल लोकसभेमध्ये मंजूर

नवी दिल्ली, १७ सप्टेंबर २०२० : बँकिंग अधिनियम सुधारणा विधेयक २०२० काल लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं. बँकिंग अधिनियम कायदा १९४९ मध्ये सुधारणा करण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आलं होतं. गेल्या काही वर्षात सहकारी आणि लहान बँका तसेच तिथल्या गुंतवणूकदारांना अनेक गैरप्रकारांमुळे अडचणींना तोंड द्यावं लागलं आहे. ते लक्षात घेऊन हे विधेयक सादर करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील पंजाब नॅशनल बँकेचे उदाहरण देत ठेवीदार आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या पैशाची बचत आणि सुरक्षा करण्यासाठी हे विधेयक असणार आहे.

बँकेप्रमाणे काम करणाऱ्या इतर लहानमोठ्या सहकारी संस्थाही इतर व्यावसायिक बँकांप्रमाणे एकाच कायद्याखाली याव्यात आणि त्यांना सुशासन आणि कार्यप्रणालीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक व्हावं, असा या विधेयकाचा हेतू असल्याचं सांगत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ते सदनामध्ये मांडले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा