नवी दिल्ली, १५ मार्च २०२१: सोमवारी आणि मंगळवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे लाखो कर्मचारी दोन दिवस संपावर असणार आहेत. दोन सार्वजनिक बँकांचे खासगीकरण आणि इतर अनेक मागण्यांच्या विरोधात बँक कर्मचारी संपावर जात आहेत. या संपात ग्रामीण बँकासुद्धा सहभागी होतील.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे १० लाख कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात निदर्शने करीत आहेत आणि आता १५ आणि १६ मार्च रोजी दोन दिवसांचा संप जाहीर करण्यात आला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की शनिवारी आणि रविवारीही बँका बंद होत्या, अशा प्रकारे सलग चार दिवस बॅंकांचे कामकाज ठप्प राहील.
एटीएम-ऑनलाइन सेवांवर काय परिणाम होईल
या संपामुळे शाखा, डिपॉझिट, चेक क्लीयरन्स, लोन क्लीयरन्स अशी सर्व कामे बंद पडतील. मात्र एटीएम सेवा सुरूच राहतील. त्याचवेळी संपादरम्यान ऑनलाईन व्यवहारातील इतर पर्याय ग्राहकांना उपलब्ध असतील.
१५ आणि १६ मार्च रोजी शाखेत जाण्याऐवजी ग्राहक युपीआय पेमेंट सर्व्हिसेसद्वारे व्यवहार करू शकतात. आपण घरातून नेट बँकिंग सेवा देखील वापरू शकता. या संपाचा एटीएमवरही परिणाम होणार नाही. म्हणजेच आपल्याकडे अनेक प्रकारचे पर्याय आहेत. प्रत्येक बँकेचे स्वतःचे मोबाइल अॅप असते.
संप का होत आहे
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात आयडीबीआय बँक व्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील आणखी दोन बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली. ज्याचा सतत बँक कर्मचारी संघटनांकडून विरोध होत आहे. आता निषेध संपाचे रूप घेत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे