पुणे, दिनांक २३ सप्टेंबर २०२२ : दरवर्षी घटस्थापना, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण लागोपाठ येतात. या सणासुदीच्या काळामध्ये बँकांचे कामकाज बंद असते. याचा प्रत्यय यावर्षीही बँक खातेधारकांना येणार आहे. बँक ग्राहकांनी आपली बँकेत काही महत्त्वाची कामे असतील तर ती याच महिन्यात करून घ्यावीत. कारण ऑक्टोबर महिन्यात बँकांना सर्वात जास्त सुट्ट्या असणार आहेत. या महिन्यात संपूर्ण देशात तब्बल २१ दिवस बँका बंद राहणार आहेत. यावेळी नवरात्रोत्सव, दसळा, दिवाळी आणि छट पूजा याबरोबर अजून काही सण असल्याने बँकांना सुट्ट्या राहणार आहेत.
यावर्षी संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये केवळ नऊ दिवस बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. उर्वरित तब्बल एकवीस दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँक खातेधारकांनी बँकेशी निगडित आपली महत्त्वाची कामे असतील, जी तुम्हाला बँकेत जाऊन करावी लागणार आहेत अशी कामे याच महिन्यात करून घ्यावीत.
भारतीय रिझर्व बँकेकडून जी सुट्ट्यांची जाहीर केली आहे, त्यामधील अनेक सुट्ट्या या राष्ट्रीय स्तरावरील आहेत. अशा दिवशी देशभरात बँकेतील कामकाज बंद राहणार आहे. यामध्ये काही सुट्ट्या स्थानिक अथवा प्रादेशिक स्तरावर देण्यात येतात. अशा सुट्ट्यांच्या दिवशी बँका फक्त त्याच्याशी निगडित राज्यांमध्येच बंद असतात. देशात वेगवेगळ्या राज्यांसाठी सुट्ट्यांची यादीही वेगळी राहते.
सुट्टीच्या कालावधीमध्ये बँकेच्या शाखा बंद असल्या तरीही ऑनलाईन सेवा सुविधा सुरू राहणार आहे. त्यामुळे बँक ग्राहक आपली कामे इंटरनेट बँकिंगद्वारे करू शकणार आहेत. परंतु अशी काही कामे आहेत जी फक्त बँकेच्या शाखेतच जाऊन करता येतात त्यांची मात्र बँकांच्या सुट्टीमुळे अडचण होऊ शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर