पुणे: गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये खळबळजनक घटना समोर येत आहेत. दिवसेंदिवस या घटना वाढत चालल्या आहेत. आज पुन्हा एकदा अशी घटना बाणेर मध्ये उघडकीस आली आहे.
पुण्यातील बाणेर येथील उच्चभ्रू सोसायटीत पतीच्या मित्राकडून पिस्तूलाचा धाक दाखवून वेळोवेळी बलात्कार केल्यानं आज बाळासाहेब सोमनाथ मुरकुटे वय ३० या आरोपीला हिंजेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत जानेवारी २०१६ ते मे २०१९ पर्यत बलात्कार व लैगिक छळ करत असल्याची माहिती मिळत आहे.