बापरे, बाहुबलीच्या दिग्दर्शकाला झाला कोरोना…..

हैदराबाद, ३० जुलै २०२०: बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही कोरोनानं शिरकाव केला आहे. बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांना देखील करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनानं गाठलं आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे.

काही दिवसांपासून मला व माझ्या कुटुंबियांना ताप येत होता. डॉक्टरांकडून औषधोपचार केल्यानंतर ताप उतरला होता. मात्र, तरीही आम्ही कोरोनाची चाचणी केली. चाचणी केल्यानंतर कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं घरातच सेल्फ क्वारंटाइन करून घेतलं आहे. आमच्या कुटुंबातील कोणालाच करोनाची लक्षण नाहीत, पण सरकारच्या नियमांनुसार आम्ही खबरदारी घेत आहोत. असं ट्विट त्यांनी केलं आहे.

राजमौली हे त्यांची पत्नी रामा राजामौला आणि मुलगी एसएस मयूखा सोबत हैदराबाद येथे राहतात. दरम्यान, ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबलीमुळं त्याचं नाव बॉलिवूड मनोरंजन सृष्टीत प्रकाशझोतात आलं. राजमौली यांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णयही घेतला आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर आम्ही प्लाझ्मा दान करणार आहोत, जेणेकरून इतर कोरोनाग्रस्तांना त्यांचा उपयोग होईल, असंही ते म्हणाले.

फॅन्सनी सोशल मीडियावर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली….

राजामौली यांच्या फॅन्सनी सोशल मीडियावर कमेंट करत, एस.एस. राजामौली आणि त्यांचे कुटुंब लवकरच बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. तसेच राजामौली ‘आरआरआर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. हा चित्रपट सुमारे ४०० कोटी रुपये खर्चून बनवला जात आहे. या चित्रपटात बाहुबलीसारखा भव्य सेट पाहायला मिळणार आहे. ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांच्या मुख्य भूमिकांसह, ‘आरआरआर’ मध्ये राम चरण आणि आलियाची नवीन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

पहिले हा चित्रपट जुलैमध्ये प्रदर्शित होणार होता मात्र, लॉकडाऊनमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली असून आता जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा