पुरंदर दि.१ सप्टेंबर २०२०:अनंत चतुर्दशी दिवशी घरगुती गणेशाचे विसर्जन करण्यात येते. राख,कर्नलवाडी व गुळूंचे परिसरात यावर्षी गणपती आगमना अगोदरच मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. त्यामुळे ओढे नाले तुडुंब भरले आहेत. या वर्षी अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच गणेश विसर्जनाला ओढ्या नाल्यांमध्ये पाणी असल्याने लोकांनी प्रथमच नीरा नदीत किंवा विहीरीत गणेश मुर्तींचे विसर्जन न करता बधा-याच्या पाण्यात विसर्जन केले.
पुरंदर तालुक्याच्या दक्षिण-पुर्व पट्यात कायम दुष्काळी परिस्थिती असते, या भागात यावर्षी मुबलक पाणीसाठा झाल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यातच गणपती विसर्जनावेळी सर्व ओढे नाले भरल्याने त्या खोल व वाहत्या पाण्यातच घरगुती गणेशाचे विसर्जन करण्यासाठी तराफा तयार करून, त्यावर एक एक मुर्ती ठेवून ती मध्यभागी विसर्जित करण्यात आली.
यावर्षी तरूणाईने मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!! च्या गजरात पुरंदरच्या ग्रामीण भागात बाप्पाला निरोप देण्यात आला.
न्यूज अनकट प्रतिनिधी