बारामतीत शासकीय कर्मकऱ्यांसाठी सॅनिटायझेशन बस सेवा

9

बारामती: बारामती शहरातील कोरोनाच्या संसर्गाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याने कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधक प्रक्रियेत काम करत असणाऱ्या शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सॅनिटायझेशन बस तयार केली आहे. असल्याचे विभाग नियंत्रक यामिनी जोशी पुणे यांनी सांगितले.

बारामती शहरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सॅनिटायझेशन व्हॅन तयार केली आहे. आज बारामती उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे यांना सोपवण्यात आली आहे. या सॅनिटायझर गाडीवर एसटी महामंडळाचे कामगार चालक असणार आहेत. शहरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर व त्यांचा स्टाफ, पोलीस प्रशासन, नगर पालिका प्रशासन, प्रांतकार्यालय, तहसील कार्यालय व सरकारी कर्मचारी यांना त्याची सेवा बजावताना किंवा घरी जाताना खबरदारी म्हणुन सॅनिटायझेशन बसच्या आत मध्ये असणाऱ्या शॉवर मधून उडणाऱ्या सॅनिटायजेशन तुषार हे बस मध्ये ४०० लिटर पाण्यामध्ये सोडिअम हायड्रो क्लोराईड हे निर्जंतुकीकरण करणारे औषध वापरले जाणार आहे.

डी.सी करंटवर बारा व्होल्टची मोटार आहे. असणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर उडणार असून त्या व्यक्तीचे पूर्णपणे निर्जंतुक करण होऊन तो आपल्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी जाऊ शकतो असे बारामती आगर प्रमुख अमोल गोंजारी यांनी सांगितले यावेळी पुणे विभाग नियंत्रक यामिनी जोशी,यंत्र अभियंता अशोक सोट पुणे,विभागीय वाहतूक अधिकारी दीपक घोडे,आगर प्रमुख अमोल गोंजारी,वाहतूक यंत्र अभियंता पांडुरंग वाघमोडे यावेळी उपस्थित होते.

                                                                                                   प्रतिनिधी – अमोल यादव