बारामती मध्ये लॉकडाऊन का दिवाळी…?

बारामती, ५ सप्टेंबर २०२० : बारामती तालुक्यात व शहरात दि ७ ते २१ सप्टेंबर चौदा दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केल्यावर आज सकाळ पासून बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. शासनाच्या कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला मात्र शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी दुकानाच्या बाहेर रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत होते यामुळे कोरोना खरच आटोक्यात येणार का अशी चर्चा नागरिकांमध्ये होती. तर सध्या कोरोना रुग्णांची वाढणाऱ्या संख्येचा वैद्यकीय सेवेवर मोठा ताण येऊ शकतो त्यासाठी लॉकडाऊन गरजेचे आहे. असे काही नागरिकांनी सांगितले.

बारामती शहर व तालुक्यात चौदा दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केल्याने आज सकाळ पासुन किराणा भुसार,भाजीपाला,शेती अवजारे विक्री व दुरुस्ती,कापड दुकान ,औषधांसह इतर दुकानात व बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळत होती. मार्च महिन्यात पंधरा दिवसांचा केलेला लॉकडाउन हा जवळपास दोन महिने सुरू होता त्या धर्तीवर नागरिकांनी आज जास्तीचा माल खरेदी करताना दिसत होते. तर अनेक दुकानात मोठी गर्दी होती तर सोशल डिस्टन्सला हरताळ लावल्याचे चित्र होते. चौदा दिवसांच्या बंदमुळे बारामती तालुका तसेच आसपासच्या तालुक्यातील अनेक नगरीक खरेदीसाठी आले होते. यामुळे कोरोना संसर्गाने बारामती शहरा बरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याचे काही नागरिकांनी तक्रारीच्या सुरात सांगितले तर आज सकाळ पासून शहरात रस्त्यावर सर्वत्र वाहनांची व नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर आज आणि उद्या होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग कमी होणार का वाढणार असा सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित होतो आहे.

शहरात चौदा दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केल्यावर खरेदीला गर्दी उसळली आहे.बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी पुढील पंधरा दिवसांचा व्यवसाय शनिवार व रविवार या दोन दिवसातच होणार आहे.तरी देखील व्यापारी लॉकडाऊन बाबत नाराज असल्याचे नागरिकांमधून ऐकण्यास मिळाले. तर हातावर पोट असणाऱ्या नागरिकांनी अचानक पुकारलेल्या जनता कर्फ्युबाबत नाराजी व्यक्त केली.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा