बारामती एमआयडीसी होणार हिरवीगार

बारामती, दि. ३० जून २०२०: बारामती येथील एमआयडीसी मधील उद्योजक हे येणाऱ्या १५ जुलै पासून ते १५ ऑगस्ट या काळात बारामती एमआयडीसी मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक हजार देशी व पर्यावरणाला पोषक असणारी वृक्षे,तसेच फळांची व फुलांच्या झाडे लावणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच झाडे लावून त्याचे योग्य संगोपन करण्याचे नियोजन करणार असल्याची माहिती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हरित एमआय डी सी सुंदर एम आय डि सी अभियान राबविले जाणार आहे. या उपक्रमात वनविभागाचेही सहकार्य असणार आहे. आज (ता. ३०) या संदर्भात झालेल्या बैठकीस वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्यासह धनंजय जामदार, उपाध्यक्ष शरद सूर्यवंशी, सचिव अनंत अवचट, खजिनदार राधेशाम सोनार, सदस्य मनोज पोतेकर, महादेव गायकवाड, मनोहर गावडे, उपस्थित होते.

एमआयडीसीतील उद्योजक व कंपन्यांना त्यांच्या भूखंडावर आतील व बाहेरील बाजूस स्थानिक प्रजातीच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहन व त्यांच्या मागणी नुसार रोपेही दिली जाणार आहेत. या वृक्षांचे संगोपन हे जबाबदारी घेतलेल्या कंपन्यांकडून केले जाणार आहे. केवळ झाडे लावून नाहीतर त्यांचे संगोपन कसे होईल याची दक्षता घेतली जाणार आहे. लागवडीपासून वृक्षसंवर्धनापर्यंत उद्योजकांना परिपूर्ण मार्गदर्शनही यात होईल. वृक्ष लागवडीसाठी स्थानिक प्रजातींची रोपे विनामूल्य उपलब्ध करून फळे व शोभिवंत झाडे यांची रोपे किमान दरात उपलब्ध करून दिली जातील. तसेच शास्त्रोक्त लागवडीसाठी संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल अशी ग्वाही बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी
दिली.

हरित एमआयडीसी सुंदर एमआयडीसी या अभियानाचा प्रारंभ बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लवकरच करणार असून बारामती, पणदरे व बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा