बारामती शहरात पाणी साठवण तलावात ऑईलचे तवंग

21

बारामती: बारामतीनगर पालिकेच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी योजनेअंतर्गत बांधलेल्या ३५५ दशलक्ष लिटर एवढी क्षमता असलेल्या पाणी साठवण तलावात मोठ्या प्रमाणात ऑइलचे तवंग दिसत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. त्यावर “न्युज उनकट”च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत पाण्यावर ऑईलचे तवंग दिसत आहेत.
हे ऑइल पिण्याच्या पाण्यात कसे आले ऑइल कोणीं टाकले आहे का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. साठवण तलावाला पूर्ण लोखंडी संरक्षक भिंत बांधली आहे.मात्र रिंग रोडच्या बाजूला असणाऱ्या तळ्याकडे जाणाऱ्या प्रवेशद्वार मात्र उघडे असल्याने येथून मोठ्या प्रमाणात नागरिक दुचाकीवरून ये-जा करत असतात. प्रवेशद्वारावर असणाऱ्या उतारावरून अंदाज न आल्यास तळ्याला नसणाऱ्या आडोशामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
पूर्वी या पाण्याच्या तळ्यावर २४ तासासाठी सुरक्षारक्षक असायचे. मात्र या नवीन बांधलेल्या तळ्यावर सुरक्षा रक्षकांची गरज असताना सुरक्षारक्षक नसल्याची तक्रार देखील येथे फिरायला येणारे नागरिक करत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा