भारतच नाही तर जगामधील उद्योग व्यवसायातील एक मोठं नाव म्हणजे उद्योगपती रतन नवल टाटा. त्यांचा आज जन्मदिवस. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक कुटुंबांना जगवण्याचे काम केले.टाटा समूहामुळे भारताचे नाव जगाच्या इतिहासात लिहिले गेले. अशा प्रसिध्द व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
१९८८साली टाटा समूहाने भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान त्यांनी आपली पहिली हचबॅक कार ‘इंडिका’ला सादर केले. मात्र लोकांनी तिला पुर्णपणे नाकारल्यामुळे कंपनीला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले.
टाटा यांनी आपल्या कार डिव्हिजनला विकण्याचा निर्णय घेत जगभरातील सर्व कंपन्यांना याबाबतचे प्रस्ताव पाठवले. पुढे अमेरिकन ‘फोर्ड’ कंपनीने खरेदीमध्ये रस दाखवत टाटा यांना फोर्डचे मुख्यालयात डेट्रॉयटला बोलावले. यावेळी त्यांची मॅरेथॉन मिटिंग झाली. मात्र यावेळी टाटा यांना मिळालेली वागणूक अत्यंत अपमानास्पद होती.
बिल फोर्ड यांनी टाटा यांना सल्ला देताना कारविषयी अनेक प्रश्न उपस्थित करत आम्ही कारची खरेदी करून तुमच्यावर उपकारच करणार असल्याचे सांगितले. नाराज होऊन टाटा यांनी हा करार न करण्याचे ठरवले.
भारतात परत येताना प्रवासादरम्यान टाटा खूप उदास आणि भावुक झाले होते. पण म्हणतात ना कटू प्रसंगानंतर सुखद प्रसंग तुमची वाट पाहत असतात. फक्त थोडा धीर धरावा लागतो. अखेर टाटा यांच्या मेहनतीला लोकांनी स्वीकारत कारमध्ये रुची दाखवण्यास सुरुवात केली. यामुळे टाटा हळू-हळू जगातील टॉप ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये सामील होण्याकडे वाटचाल करू लागली. काळ लोटला तशी परिस्थितीही बदलली. २००८ साली टाटा समूह यशाच्या शिखरावर तर फोर्ड कंपनी प्रचंड तोट्यात होती. मग टाटा यांनी फोर्डला बहुचर्चित आणि प्रसिद्ध ब्रँड जगुआर आणि लँडरोवर विकत घेण्याबाबत प्रस्ताव दिला. बिल फोर्ड हा प्रस्ताव स्वीकारत टाटाचे मुख्यालय गाठले.
यावेळी त्यांच्यात २.३ अरब डॉलरमध्ये (त्यावेळचे ९३०० कोटी) सौदा निश्चित झाला. दरम्यान फोर्ड यांनी टाटांचे कौतुक करत सांगीतले की, ‘जगुआर आणि लँडरोवर खरेदी करून तुम्ही आमच्यावर खूप मोठे उपकार करत आहात.’
याचे एक वेगळेच उदाहरण जगासमोर ठेवले.त्यांच्या एकग्रतेला आणि त्यांच्या सहनशीलतेचा सलाम.










































