बारामती, २९ डिसेंबर २०२०: शहरातील श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ ट्रस्टने आज दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीला तीन किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण केला आहे.
दर वर्षी दत्तजयंती निमित्त मंडळ महा अन्नदानाचा व समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असते. मात्र, यंदा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंडळाने सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असुन, मंडळाने शिल्लक पैशातून आज श्री. स्वामी समर्थ महाराजांच्या मुर्तीला तीन किलो चांदीचा हिरेजडित मुकुट केला आहे.
आज सकाळी सोशल डिस्टन्सचे पालन करून स्वामींना अभिषेक व आरती करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सेवेकरी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव