PHDA RDPL 2021 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद बारामती सुपर किंग्स या संघाने पटकावले

लोणी काळभोर: दि. २४ जानेवारी २०२१ : पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन तर्फे दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या टेनिस बॉल रुरल डॉक्टर प्रीमियम लिगच्या पाचवे वर्षाच्या आयोजनामध्ये बारामती सुपर किंग्स या संघाने विजेतेपद पटकावले तर उपविजेते संघ भिगवन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर झाले, तिसऱ्या स्थानावर पुरंदर डॉक्टर क्रिकेट क्लब चॅम्पियन हा संघ राहिला, मोस्ट इमर्जींग टीम म्हणून बीड डॉक्टर असोसिएशन संघाचा सत्कार करण्यात आला आहे.
डिझायर स्पोर्ट्स ग्राउंड वर दिनांक १६  ते २२ जानेवारी २०२१ पर्यंत झालेल्या टेनिस बॉल फुल पीच क्रिकेट टूर्नामेंट मध्ये अंतिम सामना बारामती सुपर किंग्स व भिगवन मेडिकल असोसिएशन या संघामध्ये अटीतटीचा झाला होता.
नानेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करताना बारामती सुपर किंग्स संघाने  डॉ. मीलींद गाढवे यांच्या पहिल्याच षटकात तीन विकेट गमावल्या पण डॉ. विनायक आटोळे यांच्या संयमी फलंदाजी ने बारामती संघाने १० ओव्हर मध्ये ६८ धावा केल्या या धावांचा पाठलाग करत असताना भिगवण संघाची संथ फलंदाजी व बारामती संघाचे चपळ क्षेत्ररक्षण अप्रतिम झेल व उत्कृष्ट गोलंदाजी च्या जोरावर भिगवनच्या प्रमुख फलंदाजांना ठरावीक अंतराने बाद केल्याने शेवटच्या षटकात १२ धावांची गरज भिगवण संघ पुर्ण करू शकले नाहीत व बारामतीने PHDA RDPL २०२१ च्या करंडकावर दिमाखात नाव कोरले आहे.
मोठं मोठाले फटके न मारता सांघीक कामगीरी ने कमी धावांचे आव्हान कसे वाचवायचे यांचे उदाहरण प्रस्थापित केले अंतीम सामन्यातील उत्कृष्ट फलंदाजी मुळे  मॅन ऑफ द मॅच डॉ. प्रशांत हगारे ठरले तर स्पर्धेचे अष्टपैलू खेळाडू डॉ. सागर वाबळे, स्पर्धेचे उत्कृष्ट फलंदाज डॉ. तेजस खटके, स्पर्धेचे उत्कृष्ट गोलंदाज डॉ. मीलींद गाढवे ठरले, या सर्वांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
स्पर्धेत लोणी काळभोर, उरुळी कांचन, दौंड, टेंभुर्णी, बीड, अकलुज, फलटन, मंचर, शिरुर,  अहमद नगर, अकोले, वाघोली, मांजरी, माळवाडी- साडेसतरा नळी इत्यादी येथील २० डॉक्टर्स असोसिएशन च्या संघांनी सहभाग नोंदविला होता.
बक्षीस समारंभास विश्वराज हॉस्पिटल चे मेडीकल डायरेक्टर डॉ. राकेश शहा व वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश नरमेठी, शिवम मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चे डायरेक्टर डॉ. टि. आर जाधव. पी. एच. डायग्नॉस्टीकचे डॉ. मनिष चढ्ढा. सह्याद्री हॉस्पिटल चे डॉ. लहाने, PHDA चे अध्यक्ष डॉ. राहुल काळभोर, सेक्रेटरी डॉ. रतन काळभोर, खजीनदार डॉ. नितीन मटकर, कार्यकारी अध्यक्ष डॉ. नितीन चौधरी, उपाध्यक्ष डॉ. नागेश गवते यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात RDPL चे अध्यक्ष डॉ. ओमकुमार हलींगे, खजीनदार डॉ. सुनील गायकवाड, डॉ. प्रवीण धर्माधिकारी, डॉ. शशीकांत रासकर , डॉ नितीन तांदळे, डॉ. संदिप महामुनी, डॉ. आनंदकुमार लखपती, डॉ. श्रिकांत लोकरे, डॉ. रंजीत म्हसवडे, डॉ. प्रतीक जोशी, डॉ. विशाल मुंढे, डॉ. गजानन चेके, डॉ. अमीत गुप्ता, डॉ. अतुल झोलेकर डॉ. वनिता काळभोर, डॉ तनुजा रासकर, डॉ. मोहीनी भोसले, डॉ. मोनेका ओमकुमार, डॉ. सुप्रिया कोद्रे, दिपाली धर्माधिकारी, दत्ता कामठे,भगवान राठोड यांचे मोलाचे योगदान राहिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा