बारामतीत वाहतूक शाखेची दुचाकीस्वारांवर कडक कारवाई

3

बारामती, दि. २९ जून २०२०:– शहरातील लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच शहरातील अनेक भागात नागरिकांच्या वर्दळीसह दुचाकी व चारचाकी वाहनांची गर्दी वाढू लागली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रस्त्यावर विनाकारण भटकणाऱ्या वाहनांवर आळा घालण्यासाठी व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहांचालकांवर दंडात्मक कारवाई चा बडगा वाहतूक विभागाने उगारला आहे. दोन महिन्यात तब्बल दंडाच्या स्वरूपात १७ लाख ५१ हजार ४०० रुपये दंड जमा करण्यात आला आहे.

बारामती शहर कोरोना मुक्त झाल्यानंतर शहरातील व्यापा-यांच्या मागणीवरून वेळेचे बंधन घालत बाजारपेठा सुरू करण्यात आला आहे. शहरातील व्यवसाय सुरू होताच पुन्हा पूर्वीसारखीच वर्दळ सुरू झाली आहे. या वर्दळीत विनाकारण फिरणा-यांची संख्या वाढू लागल्याने.आळा घालण्यासाठी बारामतीच्या वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार विना परवाना वाहन चालवणे तसेच नो पार्किंग मध्ये वाहने उभा करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, तसेच ट्रिपल सीट वाहन चालविणा-यांवर दोन महिन्यात तब्बल १७ लाख ५१ हजार ४०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.भविष्यात देखील वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.असे वाहतूक पोलीस निरीक्षक धन्याकुमार गोडसे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा