कोरोनाच्या बिकट काळात बारामतीकर गर्दी करून फिरत आहेत

बारामती, १४ सप्टेंबर २०२०: बारामती शहर व तालुक्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जनतेने जनतेसाठी १४ दिवसांचा जनता कर्फ्यू लागु केला आहे. मात्र सात दिवसांच्या आतच मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक करुन लावलेले निर्बंध तोडण्यात आलेले दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई केली होती.

जनता कर्फ्यू मध्ये लागु केलेल्या निर्बंधाच्या अटी व शर्ती लागू केल्या आहेत. त्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. शहरातील आसपासच्या रस्त्यांवर नागरिक मोठ्या संख्येने पहाटे गर्दी करून फिरत आहेत. यावेळी तोंडाला मास्क न लावल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे.

आज सर्व प्रशासनाचे अधिकारी पोलीस, डॉक्टर, पालिकेचे कर्मचारी रात्रीचा दिवस करुन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री सर्व यंत्रणेवर लक्ष ठेऊन आहेत. मात्र काही हलगर्जी नागरीक जनतेसाठी पुकारलेल्या कर्फ्यूचे उल्लंघन करीत असतील तर याला काय म्हणायचे. आज बारामतीच्या पोलीसांची अवस्था पाहता पोलीस संख्या तोकडी असताना काम मात्र चोवीस तास करत आहेत. त्यामुळे त्यांचा मानसिकता तणाव वाढत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

भाजी मंडई, फेरीवाले यांना देखील बंदी असताना चौकाचौकात भाजी विक्री होते आहे. तर काही ठिकाणी युवक गल्ली बोळातून रस्ते काढीत दुचाकीवरून फिरतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. सात दिवस होण्यापुर्वी ही अवस्था असेल तर १४ दिवस काय होईल. याबाबत प्रशासनाने नियम तोडणाऱ्यांवर वेळीच कार्यवाही करुन समज द्यावी.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा