बारामतीत मातंग समाजाकडून विविध मागण्यांसाठी एकदिवसीय उपोषण

70

बारामती : शक्ती सेना सामाजिक संघटनेच्या वतीने एक दिवसीय उपोषण करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाला डावलले जात आहे.त्यामुळे या समाजाला न्याय मिळावा यासाठी हे उपोषण केले आहे. शनिवार (दि.२१) रोजी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने बारामती येथील प्रशासन भवन येथे मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्यअनुसुचित जातीमध्ये आरक्षणाची लोकसंख्येच्या प्रमाणात अ.ब.क.ड. प्रमाणे वर्गवारी करून मातंगसमाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.
या मागणीसह संसद भवन व विधानभवन या ‘ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे व आण्णा भाऊ साठे यांचे पुतळे बसवण्यात यावेत. तसेच खालीलप्रमाणे अन्य मागण्या आहेत.
◆ संगमवाडी पूणे या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारकाचे काम तत्काळ सूरु करण्यात यावे

◆ साहित्यरत्न लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.

◆ लहजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारसी तत्काळ लागु करण्यात याव्यात.

◆ मातंग समाजाला सातत्याने होणा-या अन्याय व अत्याचाराचे निर्मूलन करण्यासाठी स्वतंत्र आयाग
नेमण्यात यावा

◆ साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे विकास महामंडळ सर्व कर्ज माफ करून नव्याने त्वरीत कर्ज उपलब्ध करून द्यावे.

◆मुंबई विद्यापिठाला साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे.

◆बारामतीत साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांचा भव्य पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा.

अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार विजय पाटील यांच्याकडे देण्यात आले. तरी लहुजी शक्ती सेनेने केलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा लहुजी शक्ती सेना तीव्र आंदोलन करण्यात येईल असे अध्यक्ष अतुल गायकवाड यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा