बार्शीत फिरत आहे ‘यम’

बार्शी, ३० एप्रिल २०२०: कोरोनाचे गांभीर्य अजूनही लोकांना समजलेले दिसत नाही ज्याअर्थी लोक घराबाहेर पडत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली अनेक तरुण मंडळी फिरण्यासाठी बाहेर पडत आहे. त्यांच्यामुळे इतरांच्याही जीवाला धोका निर्माण होत आहे हे त्यांना कळलेले नाही. ही जाणीव करून देण्यासाठी अनेक नवनवीन प्रयोग समाजातील काही व्यक्ती तसेच पोलीस करत आहेत.

असाच एक अनोखा प्रयोग बार्शी मध्ये केला जात आहे. लोकांनी घरातून बाहेर पडू नये म्हणून चक्क “यम” च दारात उभा राहत आहे. बाहेर पडलात तर “यम” रेड्यावर बसवूनच नेणार … विजय माळी व बार्शी मेडिकल असोशिएशन, बसवेश्वर ग्रुप व वृक्ष संवर्धन , बार्शी चे सदस्य विशाल बडदाळे यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे.

लोकांनी घरातून बाहेर पडू नये म्हणून अशा प्रकारे जनजागृती केली जात आहे. सर्वांना यमाची आठवण करून देत कोरोना हाच ” यम ” आहे असे सांगितले जात आहे. मृत्यूच्या भीतीने तरी लोकं बाहेर पडणे टाळातील असा त्यांचा विश्वास आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा