बावडा ग्रामीण रूग्णालय लवकरच रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार

इंदापूर, दि. १८ मे २०२०: पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्य अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केलेल्या इंदापूर तालुक्यातील बावडा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भामध्ये ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी घुले एस आर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव पवार, जिल्हा सिव्हिल सर्जन डाॅ. नंदापूरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, इंदापूर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर श्री मोरे, इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, बावडा गावचे ग्रामपंचायत चे सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे व बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये बावडा ग्रामीण रुग्णालयाची रविवारी पाहणी केली.

हे रुग्णालय लवकरच रुग्णांच्या सेवेसाठी कसे उपलब्ध होईल यासाठी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी चर्चा केली. पुढील एका महिन्याच्या आत हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी कार्यान्वित कसे होईल याठी आम्ही सर्व पदाधिकारी अधिकारी प्रयत्न करणार आहोत असे अंकिता हर्षवर्धन पाटील ‘न्यूज अनकट’ शी बोलताना म्हणाल्या.

“करोडो रुपये खर्च करून हे ग्रामीण रुग्णालय दोन वर्षापूर्वी बांधून तयार झाले असून देखील हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी कार्यान्वित करण्यात आले नाही. रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी कार्यान्वित होण्यासाठी आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहोत. पुढील एक महिन्याच्या आत हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यासाठी आम्ही पदाधिकारी व अधिकारी प्रयत्न करत आहोत.” -अंकिता हर्षवर्धन पाटील

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा