न्यूझीलंड-बांगलादेश दौऱ्यासाठी बीसीसीआयने केला भारतीय संघ जाहीर

पुणे, १ नोव्हेंबर २०२२ : टी ट्वेंटी विश्वचषकानंतर होणाऱ्या बांगलादेश आणि न्युझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची बीसीसीआयने घोषणा केलीय. निवड समितीनं न्युझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शिखर धवनची कर्णधारपदी नियुक्ती केली. तर हार्दिक पांड्या टी ट्वेंटी मालिकेत कर्णधार असंल. त्याचबरोबर न्युझीलंडविरुद्ध मालिकेसाठी ऋषभ पंतची उपकर्णधार पदी निवड करण्यात आली आहे. तर समितीनं बांगलादेश विरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा कडे कर्णधारपद सोपवले आहे.

भारतीय संघाचा न्युझीलंड दौरा हा १८ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. तर संघाचा बांगलादेश दौरा हा ४ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. या मालिकेत भारताला न्युझीलंडविरुद्ध ३ टी ट्वेंटी आणि ३ वनडे सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. तर बांगलादेश विरुद्ध ३ वनडे आणि २ कसोटी सामने खेळायचे आहेत.

न्यूझीलंड विरुद्ध टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघ :
https://twitter.com/BCCI/status/1587069079596040193?t=rMkc23ULtZJfZbRqrdU0kA&s=09

न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
https://twitter.com/BCCI/status/1587069351315722240?t=-MaHPEeZVRq7aiXmLIn_TA&s=09

बांगलादेश विरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
https://twitter.com/BCCI/status/1587069763322204160?t=ixmBPJdApQ9eDPBMVze04g&s=09

बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
https://twitter.com/BCCI/status/1587070062703173632?t=x-PmM2n158nRGqkln3WfkA&s=09

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा