IPL 2022 Venue Update, 23 जानेवारी 2022: इंडियन प्रीमियर लीग 2022 चा हंगाम जवळ येत आहे. यावेळी आयपीएल भारतात होणार होतं, मात्र कोरोनाच्या वाढत्या केसेसने बीसीसीआयला विचार करायला भाग पाडलं आहे. शनिवारी बीसीसीआय आणि आयपीएलच्या संघांमध्ये नवीन हंगामाबाबत चर्चा झाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयला आशा आहे की आयपीएलचं आयोजन भारतातच केले जाईल. यासाठी खेळाडूंना जास्त प्रवास करावा लागणार नाही, यासाठी मुंबई आणि नजीकच्या शहरांकडं पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. याशिवाय आयपीएल सुरू होण्याची तारीख 27 मार्च असू शकते.
कारण अजूनही कोरोनाचा कालावधी आहे, अशा परिस्थितीत खेळाडूंना बायो-बबलमध्येच राहावं लागंल, अशा परिस्थितीत बीसीसीआयचा प्रयत्न आहे की जर आयपीएल भारतात आयोजित केलं गेलं तर अशी जागा असावी जिथं स्टेडियम असंल. अधिक म्हणजे विविध सामने आयोजित करता येतील.
मात्र, कोरोनाचा विचार करून बॅकअप प्लॅनचाही विचार सुरू आहे. आयपीएल भारताबाहेर गेलं तर दक्षिण आफ्रिका किंवा यूएई हाच पर्याय असू शकतो, संघांची निवडही तीच असंल.
मेगा लिलावाची तारीख जवळ येत आहे
कोरोनामुळं IPL 2021 चा अर्धा मोसम देखील UAE मध्ये आयोजित करण्यात आला होता. अशा परिस्थितीत यंदा आयपीएल भारतातच होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती, पण कोरोनाच्या नव्या लाटेनं सर्व योजना उद्ध्वस्त केल्या आहेत.
बीसीसीआय सध्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मेगा लिलावाची तयारी करत आहे. तर आयपीएल 2022 एप्रिलमध्ये सुरू होऊ शकतं. मेगा लिलावापूर्वी सर्व खेळाडूंनी आपली नावं दिली आहेत, यावेळी लिलावासाठी 1200 हून अधिक खेळाडूंनी अर्ज केले आहेत.
यावेळी आयपीएलमध्ये एकूण 10 संघ सहभागी होत आहेत, अहमदाबाद आणि लखनऊ हे संघ प्रथमच आयपीएलचा भाग असणार आहेत. सर्व दहा संघांनी लिलावापूर्वी आपापल्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावं सादर केली आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे