कोरोनाच्या नव्या लाटेसाठी तयार राहा, WHO चा देशांना सतर्क राहण्याचा इशारा

नवी दिल्ली, १६ जुलै २०२२: जगात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा फैलाव सुरू झाला आहे. काही महिन्यांपासून नियंत्रणात असलेली परिस्थिती पुन्हा
बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना संक्रमितांच्या संख्येत वाढ होत असून मृतांचा आकडाही वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

बदलत्या आकडेवारीमुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अलर्ट जारी केला आहे. कोरोनाच्या नव्या लाटेपासून सावध राहा असं WHO नं आवाहन केले आहे. WHO चे प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, आता आपल्याला सज्ज राहावं लागणार आहे. जे नवे व्हेरिएंट समोर आले आहेत.

त्यांचे प्रत्येकाचे स्वरूप बदलले आहे. जितक्या मोठ्या प्रमाणात संक्रमित रुग्णाची संख्या वाढेल तितके रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे प्रत्येक देशाने त्यांच्याकडे एक एक्शन प्लॅन तयार ठेवायला हवा अशी सूचना त्यांनी केली आहे.

कोरोनाच्या मृतांचा आकडा अलीकडे कमी झाला होता तो देखील वाढला आहे. वर्ल्ड बँकेचे सल्लागार philip schellekens यांच्या ट्विटरवर सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विट केले आहे. सौम्या स्वामीनाथन यांनी प्रत्येक देशाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सध्या अमेरिका, फ्रान्स, इटली, आणि जपानमध्ये कोरोनाचे सवाधिक रुग्ण आढळत आहेत. त्याचसोबत मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ब्राझील पुढे आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येत आणि मृतांचा आकडा वाढणे हे योग्य संकेत नाहीत असं WHO चे संचालक Tedros Adhanom Ghrbreyesus यांनी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा