उस्मानाबाद, ३० जुलै २०२० : उस्मानाबाद जिल्ह्यातील कुन्हाळी, तालुका उमरगा येथे अतिशय क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीला समुह करून मारहाण करण्यात आली.
काल दिनांक २९ जुलै रोजी, कुन्हाळी गावातीलच रवी संतराम नरवटे यांनी त्याच्याच गावातील लक्ष्मीकांत पाटील यांच्या घरासमोरून अतिशय वेगात मोटारसायकल चालवली. या कारणाने, लक्ष्मीकांत पाटील यांनी रवी नरवटे यांस हटकले.
आपल्याला हटकल्याचा राग मनामध्ये ठेवून, रवी नरवटे यांनी ब्रम्हानंद मुटले, रतन कुकूर्डे, कुलदीप भोगीले, आकाश भोसले, प्रकाश कुकूर्डे, महेश नरवटे, तुळशीराम मुटले, यांना सोबत घेऊन आज दिनांक ३० जुलै रोजी लक्ष्मीकांत पाटील यांना ७.३० च्या सुमारास गावातील शेत रस्त्यावर अडवले. तसेच, त्यांच्यावर शिवीगाळ करत काठीने मारहाण देखील केली. घडलेल्या या प्रकरणावरून, लक्ष्मीकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित ८ व्यक्तींविरूद्घ गुन्हा नोंदवला गेला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रगती कराड.