गोल पोस्ट स्पॉटलाइट “बिग बी” यांची सुंदर कविता, डॉक्टरांचे मानले आभार 

“बिग बी” यांची सुंदर कविता, डॉक्टरांचे मानले आभार 

मुंबई, दि. १५ जुलै २०२०: महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाण मुलगा अभिषेक बच्चनचा रिपोर्टही कोरोना पॉझिटीव्ह आला. सध्या ते आणि मुलगा अभिनेता अभिषेक यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिग बींनी ट्विटरवर स्वत: याबद्दलची माहिती दिली. रुग्णालयात असले तरी बिग बी सोशल मीडियावर सक्रिय आहेत आणि त्यांनी ट्विटरवर एक कविता पोस्ट करत डॉक्टर व नर्सेसना सलाम केला आहे.  

बिग बी यांनी ट्विटरवरून लिहिलेली कविता: 

श्वेत  वर्ण  आभूषण
सेवा भाव  समर्पण
ईश्वर रूपी  देवता ये
पीड़ितों के  संबल  ये
स्वयं को मिटा दिया
गले हमें लगा लिया
पूजा दर्शन के स्थान ये
परचम इंसानियत के
~ अब

संकटातही रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्ससाठी त्यांनी या ओळी लिहिल्या आहेत. इतरांची सेवा करणारे हे डॉक्टर व नर्सेस पूजनीय असल्याचं त्यांनी या कवितेत म्हटल आहे.अजून किमान सात दिवस अभिषेक आणि अमिताभ यांना रूग्णालयात ठेवण्यात येणार आहे. ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्य या दोघींचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. मात्र त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षण असल्यामुळे त्यांना घरीच आयसोलेट करण्यात आलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version