खासदारांची पत्नी कोविड योध्याच्या भूमिकेत

मुंबई, दि.१ मे २०२० : अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सौभाग्यवती डॉ. अश्विनी अमोल कोल्हे यादेखील कोरोना विषाणूंच्या संकटाशी दोन हात करत कोविड योध्दा म्हणून पुढे आल्या आहेत. त्या कोरोना रुग्णांची सेवा करताना दिसत आहेत.
डॉ अश्विनी कोल्हे ह्या केईएम रुग्णालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून २००९ पासून कार्यरत अाहेत. त्याचबरोबर रक्तवाहिन्या, शवविच्छेदन, चेतारोग विज्ञान तसेच जठरमार्गावरिल उद्भवणारे विकार यासारख्या पॅथॅलॅाजी विभागात देखील काम करत आहेत.

याशिवाय त्यांची दुसरी ओळख सांगायची झाली तर त्यांचे यजमान हे अभिनय क्षेत्राबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तसेच त्यांना दोन मुले आहेत. असा त्यांचा छोटेखानी परिवार आहे. रोज सकाळी उठून घरातील कामे, दोन्ही मुलांना नाष्टा, जेवणाची व्यवस्था करुन त्या रोजच्या वेळेवर रुग्णालयामध्ये उपस्थित असतात. रुग्णालयातील इतर सहकारी यांसोबत सर्वात अग्रभागी असणाऱ्या या डॉ. अश्विनी कोल्हे आहेत.

सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीवर इतर रुग्णालयांप्रमाणे केईएम रुग्णालयांमध्येही अनेक रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवलेले असून त्या त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. कधी रुग्णालयातून घरी जाण्यास उशीर झाला तर आपल्या दोन्ही चिमुकल्यांना आपण लढत असलेली कोरोना विरुध्दची लढाई त्या अभिमानाने सांगतात.

कोल्हे या एक महिला असूनही घरी न थांबता बरोबर सोबतीला दोन लहान मुलांना घेऊन स्वतःचे कुटुंब सांभाळत आपले कर्तव्य बजावत आहेत. आपले पती लोकप्रतिनिधी असल्याने प्रसार माध्यमांवर कोरोना विरुध्दची लढाईत सतत समुपदेशनाबरोबर आपल्या मतदार संघातील उपेक्षित घटकांना मदत मिळावी यासाठी सतत काम करत आहेत.

आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा वापर करत आज दोघेही वेगवेगळ्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात ऑन फिल्ड सेवा करत असल्याने एक आदर्शवत असे वाटते.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा