बीड : शहरातील जालना रोड येथे असणार्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेला शनिवारी(दि.२१) रोजी सांयकाळी ५ च्या दरम्यान आग लागली. शाखेच्या पाठीमागील खिडकीतुन धुराच्या लोन नागरीकांनी पाहीले तात्काळ याची माहिती अग्नीशामक दलाला देण्यात आली.
अग्नीशामक दल व शहर पोलीस ठाण्याचे कर्मचार्यांनी घटने स्थळी धाव घेतली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र रविवार असल्याने बँकला सुट्टी होती. आग शॉटसर्किटमुळे लागली असल्याची चर्चा होती.
मागील ५ ते ६ वर्षापासुन जालना रोड येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची मुख्य शाखा कार्यरत आहे. दररोज येथे बँकेचे ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्याच बरोबर बँकेतील कर्मचार्यांची संख्याही मोठी असते. रविवार असल्याने बँकेला सुट्टी होती. सांयकाळी ५ च्या सुमारास काही नागरीकांना बँकेच्या पहिल्या मजल्या वरील खिडकी मधुन धुराचे लोन पाहीले काही वेळातच नागरीकांनी शहर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली.
घटनास्थळी तात्काळ शहरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अग्नीशामक दला दाखल झाले. आग विझवण्याचे काम अग्नीशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. बँकेतील महत्वाचे रेकॉड जाळाले असल्याची माहिती पुढे आली आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. परंतु शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. नेमकी कश्यामुळे लागली, याची पुष्टी मिळाली नसली तरीही आग शॉटसर्क्रिट मुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.