कोटा येथे अडकलेले बीडचे विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले

बीड,दि.२८ एप्रिल २०२०: जिल्ह्यातील ५५ ते ६० विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कोटा ( राजस्थान ) येथे गेलेले होते. लॉकडाऊनमुळे हे सर्व विद्यार्थी त्याठिकाणी अडकले होते. हे विद्यार्थी आज (मंगळवारी) दुपारी सुखरूप बीड शहरात दाखल झाले आहेत.

यासंदर्भात राज्य शासनाने दखल घेवून बीडसह राज्यातील इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

जिल्हा प्रशासनाकडूनही यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. राज्य सरकारच्या परवानगीनंतर या विद्यार्थ्यांना त्या – त्या जिल्ह्यातून आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागली होती. आज (मंगळवारी) दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास कोटा (राजस्थान) येथे अडकलेल्या बीडच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यात आले.

एका खाजगी ट्रॅव्हल्सने या विद्यार्थ्यांना बीड बसस्थानकाच्या पाठीमागील रोडवर आणण्यात आले. याठिकाणी शिवाजीनगर पोलिसही दाखल झाले होते. दरम्यान लॉकडाउनमुळे कोटा येथून अडकलेले विद्यार्थी परत आल्याने कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा