अधिवेशनाआधी… आणि

मुंबई, १६, ऑगस्ट, २०२२ : आज संध्याकाळी म्हणजे १६ ऑगस्टच्या संध्येला मंत्रिमंडळाची चहा-पानाची बैठक होणार आहे. खातेवाटपानंतर अधिवेशनाच्या आधीची पहिली केबिनेट आज होत आहे. ही कॅबिनेट बैठक नाराजीच्या सूत्राखाली चालली असल्याची चर्चा आहे. या अधिवेशनात शिंदे गटाची अशीही कसोटी लागणार आहे. ठाकरे विरोधक आणि शिंदे गट यांच्यात जुगलबंदी होण्याची दाट शक्यता आहे. खातेवाटपाच्या पहिल्या टप्प्यात मुळातच नाराजी असल्याने आता पावसाळी अधिवेशन गाजणार हे नक्की. पण त्यातही आता विरोधकांमध्ये बाळासाहेब थोरात यांनी अधिवेशनात अजित पवारांना उद्देशून आता एकजुटीने लढण्याचा सल्ला दिला आहे.

उद्याच्या अधिवेशनात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यात खास करुन मंत्रिमंडळाला झालेला उशीर, पूरग्रस्तांना मिळणारी मदत आणि मेट्रो कारशेडच्या जागेच्या प्रश्नांवरुन सरकारला घेरण्याचा विरोधकांचा विचार आहे. या मुद्द्यावरुंन शिंदे गट अडचणीत येऊ शकतो. या संदर्भात विरोधक आज पत्रकार परिषद घेणार आहे.

तर दुसरीकडे विधानपरिषद सभापतीपदासाठी राम शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. राज्यपालांकडे हा प्रस्ताव गेला असून लवकरच त्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर आता उद्याच्या अधिवेशनात नक्की काय गोष्टी घडणार, काय गोंधळ उडणार हे पहाणं औत्सुक्याचं ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा