मुंबई, १२ डिसेंबर २०२२: बॉलीवूडचा किंग शाहरुख खान त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुख खान मक्का, सौदी अरेबियामध्ये उमराह करताना दिसला होता. त्यानंतर आता त्याने वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे. चित्रपटाला यश मिळावे, अशीच प्रार्थना त्याने वैष्णोदेवीच्या दरबारी केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.
आपली ओळख पटू नये यासाठी शाहरुख खानने काळे कपडे घातलेले दिसत आहेत. त्याचप्रमाणे गजबजलेल्या ठिकाणी कोणालाही आपली ओळख पटू नये म्हणून त्याने चेहराही लपवला आहे. डोळ्यांवर गडद रंगाचा चष्मा लावला आहे. हे सर्व जरी त्यांनी केले असले तरीही लाखो करोडो चाहत्यांचा नजरेतून सुटला तर तो शाहरुख खान कसा… आणि म्हणूनच या व्हिडिओत मास्क घालून गेलेल्या व्यक्तींमध्ये शाहरुख खान देखील आहे असे म्हणत हा व्हिडिओ वेगाने शेअर झाला आहे.
दरम्यान, ब्रेकनंतर शाहरुख खान आता दोन-तीन चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होतोय. याच चित्रपटातील ‘बेशर्म…’ या गाण्यातील लुक शाहरुख खानने शेअर केला आहे. या फोटोमध्ये केसांची पोनी आणि गळ्यात लांब सिल्वर रंगाची चेन अशा पठाणी लुकमध्ये शाहरुख खान दिसला आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे