न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीपूर्वी केएल राहुल संघातून बाहेर, मिळाली या खेळाडूला जागा

24 नोव्हेंबर 2021: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. केएल राहुलच्या जागी सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुलच्या डाव्या मांडीच्या स्नायूमध्ये ताण आला होता, त्यामुळे तो संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. केएल राहुलच्या जागी सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे.
केएल राहुलला विश्रांती देण्यात आली आहे, त्यानंतर तो एनसीएसाठी तयारी करेल आणि पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी फिट होईल.

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ:

अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा