बेळगाव सीमा प्रश्नी तब्बल पाच वर्षानी सर्वोच्च न्यायाल्यात सुनावणी

मुंबई,३० ऑगस्ट २०२२: सर्वोच्च न्यायाल्यात प्रलंबित असलेल्या बेळगाव प्रश्नांवर आज सुनावणी होणार आहे. तब्बल पाच वर्षानी हे प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायाल्यात सुनावणीसाठी येत असल्याने सीमावर्ती भागातील नागरिकांप्रमाणेच संपुर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायाल्यात राज्याची बाजू मांडणाऱ्या वकिलांशी फोनवरुन चर्चा केली आहे. या आगोदर अनेकदा सूनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. यापूर्वी २०१७ साली या प्रकरणी सुनावणी पार पडली होती. त्यानंतर तब्बल पाच वर्षानी या प्रश्नांवर पुन्हा एकदा सूनावणी होणार आहे.

यासूनावणी वेळी जेष्ठ वकील राकेश द्विवेदी व शिवाजीराव जाधव हे महाराष्ट्र राज्याची बाजू मांडणार आहेत. तर राज्याकडून अपर सचिव सदाफुले हे उपस्थित राहणार आहे. यावेळी कर्नाटक राज्याने दाखल केलेल्या १२ अ या अंतरीम अर्जावर सूनावणी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सूनावणीबद्दल माहिती घेऊन दिल्लीतील वकिलांशी फोनवरुन चर्चा केली. काहीही झालं तरीही सीमावर्ती भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा