बेंद ओढ्याला आले नदीचे स्वरूप, ३१ किलोमीटर काम पुर्ण

सोलापूर, दि. १५ जुलै २०२०: बेंद ओढा पुनर्जीवन झालेल्या ३१ किलोमीटरच्या भागात या वर्षी झालेल्या भरपूर पावसामुळेच मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले असून यामुळे या परिसरातील भूजल साठा वाढला आहे. राहिलेल्या सहा किलोमीटरच्या कामासाठी व भीमा सीना जोड कालवा साठी शॉप्ट क्रमांक ३ मधून पाणी ओढ्यात सोडण्यासाठी पाच कोटी रुपये निधीची आवश्यकता असल्याचे माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे यांनी सांगितले.

तालुक्याच्या उत्तर व पश्चिम बाजूस ढवळस हद्दीतून ते पूर्व सीमेच्या महादपूर पर्यतच्या सीना नदीपर्यंत सुमारे १३ गावांच्या हद्दीत आणि शिवे वरून गेलेल्या ३९ किलोमीटर लांबीचा बेंद ओढा आहे. या ओढ्याच्या पुनर्जीवनाचे काम तीन वर्षांपूर्वी माढा वेलफेयर फाउंडेशनने हाती घेतले असून सुमारे अडीच वर्षात ३९ किलोमीटर लांबी पैकी ३१ किलोमीटर गाळमुक्तीचे,ओढा सरळीकरण व अतिक्रमण हटवणे हे काम पूर्ण झाले आहे.

राहिलेल्या सहा किलोमीटर कामासाठी खोलीकरण व रूदींकरण यांच्या प्रमाणात सहा लाख क्युबिक मीटर गाळ काढणे आवश्यक आहे. यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे धनराज शिंदे यांनी सांगितले.

यावेळी माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ संताजी पाटील, कृषी अधिकारी पाटील आदींनी बेंद ओढ्याची पाहणी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा