मनुके खाण्याचे फायदे……

पुणे, १६ डिसेंबर २०२०: आजच्या आधुनिक काळातील जीवन हे फार धावपळीचे झाले आहेत. त्यामुळे आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतात. अश्यात प्रत्येकाने थोडा वेळ आरोग्यासाठी देणे गरजेचे असते. त्यासाठी खाण्यात देखील बदल करणे महत्त्वाचे आहे. आज अशाच एका ड्रायफ्रुट बद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामुळे आरोग्याला अनेक गुणकारी फायदे होतात.

“मुनका” ड्रायफ्रुटचा एक विशेष प्रकार ज्याच्या खाण्याने आरोग्याला चांगले फायदे होतात. आयुर्वेदानुसार मनुक्यांमध्ये भरपूर मात्रेत औषधीय गुण असतात. रोज ४-५ मनुक्यांचे सेवन केले पाहिजे. त्यात उपस्थित न्यूट्रिएंट्स बर्‍याच आजारांमध्ये फायदेशीर ठरतात. तर जाणून घेऊ रोज मनुका खाण्याचे काय फायदे आहेत.

१) मनुक्यांना सर्दी-खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वात उत्तम औषध मानले जाते. त्याशिवाय देखील मनुक्यांचे बरेच फायदे असतात.

२) मनुका खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव होतं. यामुळे त्वचेची रंगत वाढते आणि रंग देखील निखरण्यास मदत होते.

३) मनुकांमध्ये फायबर्स असतात. हे डायजेशन योग्य ठेवण्यास मदत करतात.

४) यात पोटॅशियमची मात्रा जास्त असते. मनुका हार्ट अटॅकच्या आजारांमध्ये इफेक्टिव आहे. आयरन असतं. हे ॲनीमिया दूर करण्यास फायदेशीर ठरतात.

५) अँटीऑक्सीडेंट्स असतात. यामुळे कँसर सारख्या गंभीर आजारांपासून बचाव होण्यास मदत मिळते.

६) यात अँटीबॅक्टीरियल गुण असतात. यामुळे सर्दी-खोकला ठीक होण्यास मदत मिळते.

७) यात बीटा कॅरोटीन असतो. जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. तसेच यात ऑक्जेलिक ऍसिड असतं. यामुळे दात मजबूत होतात. यामुळे गम प्रॉब्लमपासून बचाव होतो.

८) कॅल्शियमची मात्रा अधिक असते. म्हणून ज्वॉइंट पेनपासून बचाव होतो.

९) याचे सेवन केल्याने बॉडीचे टॉक्सिन्स दूर होऊन हेयर फॉलची समस्या देखील दूर होते.

या सर्व फायद्यांमुळे आपण नियमितपणे मुनके खाल्ले तर आरोग्याला निरोगी ठेवण्यास मदत होते. तसेच या धगधगत्या आयुष्यात थोडा वेळ आरोग्यासाठी नक्की काढून मुनके खा आणि तंदुरुस्त रहा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा