मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई, ८ ऑगस्ट २०२२ : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून संप पुकारलेल्या होता. सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत काही मागण्या मान्य केल्यामुळे हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत सर्व चालक आपापल्या बसवर कार्यरत होणार असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत वार्षिक रजा या भर पगारी करण्यात याव्यात, कर्मचाऱ्यांना वार्षिक बोनस, साप्ताहिक रजा, वार्षिक वेतनवाढ मिळावी तसेच कामगारांना कामावर येण्यासाठी मोफत पास देण्याची सुविधा देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. दरम्यान अन्य मागण्यांसाठी बस कॉन्ट्रॅक्टर सोबत आयुक्तांनी बैठक घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा