गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई सलग तिसऱ्या दिवशी बेस्टच्या कंत्राटी चालकांचे आंदोलन सुरूच, प्रवाशांचे हाल

सलग तिसऱ्या दिवशी बेस्टच्या कंत्राटी चालकांचे आंदोलन सुरूच, प्रवाशांचे हाल

मुंबई, ४ ऑगस्ट २०२३ : बेस्ट उपक्रमातील कंत्राटी चालकांनी पगार वाढीच्या मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशी आज कामबंद आंदोलन केले. गुरुवारी नऊ डेपोतील वाहतूक बंद होती. त्यांची व्याप्ती वाढून आज जवळजवळ सर्वच डेपोतील भाडे तत्वावर बस पुरविणाऱ्या पाच कंपन्यांच्या कंत्राटी चालकांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे पहाटे पासून एकही बस बाहेर पडली नसल्याने प्रवाशांचे खूपच हाल झाले.

बेस्टच्या ताफ्यात एकूण ३ हजार ८२ बस आहे. त्यापैकी १ हजार ६४२ बस पाच कंत्राटदाराद्वारे भाडेतत्त्वावरील आहेत. बेस्टच्या २७ डेपोमधून भाडेतत्त्वावरील बस धावतात. कंत्राटदारांकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन आणि ईतर आर्थिक सुविधा पुरविण्यात येत नसल्याने वारंवार हे कर्मचारी कामबंद आंदोलन करतात. बुधवारी पहाटे पासून घाटकोपर, मुलुंड या दोन डेपोतील चालकांनी बंद आंदोलन सुरू केले होते.

गुरुवारी तब्बल नऊ डेपोतील वाहतूक बंद होती. आज पहाटे पासून सर्वच डेपोतील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांचे हाल झाले. बुधवारपासून हे कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने सर्वच मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेषतः शाळकरी मुले, चाकरमान्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version