गोल पोस्ट इतर राजकारण संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टात याचिका, संजय राऊत यांच्या...

संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टात याचिका, संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार?

मुंबई, ४ ऑगस्ट २०२३ : मुंबईतील कथित पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केलीय, यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या याचिकेत ईडीने संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसा संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचला. प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊत यांच्यापर्यंत पैसा पोहोचला. प्रवीण राऊत संजय राऊतांचे फ्रंट मॅन, असल्याचा आरोप ईडीने आरोप पत्रात दाखल केला आहे.

राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ईडीच्या आरोपांवर संजय राऊत यांच्या वकिलांचा आक्षेप नोंदवण्यात आलाय. सात ऑगस्टला पत्राचाळ प्रकरणी सुनावणी होणार आहे. परंतु त्या आधीच संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version