बेंबळे गावचे पोलीस पाटील किर्ते यांना कोवीड योध्दा पुरस्कार

9

सोलापूर (माढा), ८ डिसेंबर २०२०: माढा तालुक्यातील बेंबळे गावचे पोलीस पाटील बीभिषण किर्ते यांचा कोरोना कार्यकाळात केलेल्या उत्कृष्ट व तत्पर कार्याबद्दल तसंच महत्त्वपूर्ण वेगवेगळ्या गुन्हेगारी कृत्यातील तपासकामात पोलिसांना आवश्यक ते सहकार्य केल्याबद्दल, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय मनोजकुमार लोहिया यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

वृत्तांत असा की, टेंभुर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटील मेळावा व कोविड वॉरियर्स सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी बेंबळेचे पोलीस पाटील बिभीषण किर्ते यांचा विशेष सन्मान करण्यात आला व त्यांच्या कामाची प्रशंसा करण्यात आली.

याप्रसंगी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर विशाल हिरे, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, परिसरातील ४८ गावचे पोलीस पाटील बंधू-भगिनी व मान्यवर नागरिक उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

4 प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा