उल्हासनगर, दि. २४ जुलै २०२०: उल्हासनगरमध्ये कोरोनाचा प्रभाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे फक्त उल्हासनगर मध्येच नव्हे, तर आजूबाजूच्या शहरामध्ये सूद्धा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहून महापालिकेने आत्ता पर्यंत दोन वेळा लॉकडाउन वाढवला आहे. मात्र सततच्या वाढत्या लॉकडाउनमुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. तसेच २२ जुलै नंतर लॉकडाउनमध्ये वाढ करू नका, असे पत्रही व्यापारी संघटनेने पालिका आयुक्तांना दिले होतो.
त्यानंतर मात्र उल्हासनगरमध्ये प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतर भागात लॉकडाउन शिथिल केला. लॉकडाउन उठवल्यानंतर मात्र अगदी २० दिवसांनंतर P1 आणि P2 पद्धतीने म्हणजेच सम विषम पद्धतीने दुकाने सुरू झाली मात्र दुकाने उघडल्याने नागरिकांनी दुकानात एकच गर्दी केली.
लॉकडाउन उठवल्यामुळे दुकानं सुरू झाली मात्र यामुळे सोशल डिस्टन्सचे तीन तेरा वाजलेत आणि अनेक नागरिक तथा दुकानदार हे मास्क न घालता फिरताना आढळले. त्यामुळे महापालिकेने आता दंडात्मक कारवाई करायला सुरूवात केली आहे. जर पहिल्यांदा डिस्टन्स न पाळताना आढळले १० हजार आणि जर दुसऱ्या वेळी आढळले असता १५ हजारांचा दंड आकारला जाणार आहे आणि जर दुकानात तिसऱ्यांदा सोशल डिस्टन्सचे पालन केले नाहीतर दुकाने बंद ठेवण्याची कारवाई केली जाणार आहे. नागरिक मास्क न घालता फिरताना तिसऱ्यांदा आढळले तर त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे कदाचित ही कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल यामुळे महापालिकेच्या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत केलं जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे