गोल पोस्ट राष्ट्रीय अनोळखी कॉलपासून सावधान ; मंत्री अश्विनी वैष्णव यांचे देशभरातील नागरिकांना आवाहन

अनोळखी कॉलपासून सावधान ; मंत्री अश्विनी वैष्णव यांचे देशभरातील नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली, ६ जून २०२३: भारतात ऑनलाईन फसवणूक प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे. अज्ञात आंतरराष्ट्रीय नंबरवरुन अनेकांना संदेश आणि कॉल येत असल्याच्या घटना पाहायला मिळत आहे. यामध्ये व्हाट्सअप या मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून फ्रॉड कॉल्सचे प्रमाण वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतीय नागरिकांना अनोळखी नंबरवरुन येणारे फोन उचलू नयेत असे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्पॅम कॉल आणि सायबर फसवणूकी बाबत सतर्क राहण्यासाठी ‘संचार साथी’ हे पोर्टल सुरू केले आहे. त्यांनी नागरिकांना केलेल्या अवाहनानूसार, केवळ अशाच फोन कॉल्सना प्रतिसाद धा जे नंबर तुम्ही ओळखता. तसेच ते असे देखील म्हणाले की, मंत्रालयाद्वारा केलेल्या उपाय योजनांमुळे सायबर फसवणूकीच्या घटनांमध्ये उल्लेखनीय घट झाली आहे.

सायबर फसवणूक घटनांना प्रतिरोध करण्यासाठी दूरसंचार मंत्रालयाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ‘संचार साथी’ या पोर्टल द्वारे अशी प्रकरणे हाताळली जाणार आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून ४० लाखांहून अधिक ४१ हजार चुकीच्या ‘पॉईट ऑफ सेल’ एजंट्सना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version