BGMI गेम बॅन ! काय आहे कारण?

पुणे, २९ जुलै २०२२: PUBG मोबाईलवर भारतात बंदी घातली गेली असेल, पण हे नाव आतापर्यंत चर्चेत आहे. PUBG Mobile BGMI (Battlegrounds Mobile India) ची पुनर्ब्रँडेड आवृत्ती आता चर्चेत आहे. क्राफ्टनची ही गेम गुगल प्ले स्टोअर आणि apple app store वरून गायब झालीय. अहवालानुसार, सरकारच्या आदेशानंतर दोन्ही प्लॅटफॉर्मने ही गेम काढून टाकली आहे.

PUBG मोबाईल किंवा BGMI च्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे एक खुनाचे रहस्य. काही दिवसांपूर्वी एक प्रकरण समोर आले होते, ज्यामध्ये ‘PUBG सारख्या ऑनलाइन गेम’मुळे १६ वर्षांच्या मुलाने आईची हत्या केल्याचे बोलले जात आहे.

संसदेत चर्चा

आई त्याला गेम खेळण्यापासून रोखायची. हे प्रकरण संसदेत पोहोचले, जिथे सरकारने सांगितले की गृह मंत्रालय त्याची चौकशी करत आहे. सरकारने म्हटले आहे की, काही बंदी घातलेले ऍप पुन्हा एकदा नाव बदलून भारतीय बाजारात दाखल झाले आहेत.

गृह मंत्रालय त्याची चौकशी करत आहे. असा सवाल गेल्या आठवड्यात राज्यसभा खासदार व्ही विजयसाई रेड्डी यांनी केला होता. त्यांनी विचारले होते की आयटी मंत्रालय PUBG सारख्या गेमवर काही कारवाई करत आहे का, ज्यामुळे ‘काही मुलांना गेम खेळण्यापासून रोखले जात असताना ते गुन्हे करत आहेत’.

गेमवर बंदी आहे का?

या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सभागृहात दिले. ते म्हणाले, ‘MeitY ला अनेक अहवाल आणि तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की जे ऍप्स ब्लॉक करण्यात आले आहेत ते नवीन स्वरूपात परत येत आहे. हे सर्व अहवाल आणि तक्रारी एमएचएकडे चौकशीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

क्राफ्टनचे काय म्हणणे आहे?

क्राफ्टनच्या प्रवक्त्यानेही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. Google Play Store आणि Apple App Store वरून BGMI कसे काढले गेले हे स्पष्ट करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उत्तर मिळाल्यानंतर ते पुढील माहिती देणार आहेत. त्याच वेळी, Google च म्हणणं आहे की त्यांनी गेम काढून टाकण्यापूर्वी क्राफ्टनला माहिती दिली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा