भारत-चीन चर्चेत सकारात्मक बोलणी, ताणतणाव कमी करण्यास सहमत

5

नवी दिल्ली, दि. ७ जून २०२०: लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) भारतीय आणि चिनी सैन्यामधील विवाद संपवण्यासाठी शनिवारी (६ जून) दोन्ही देशांमधील कमांडर-स्तरीय बैठक झाली. आता या बैठकीसंदर्भात केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की ६ जून २०२० रोजी भारतीय सैन्य कमांडर आणि चीनी कमांडर यांच्यात चुशुल-मोल्दो भागात बैठक झाली. ही बैठक सौहार्दपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात पार पडली.

या बैठकीसंदर्भात माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अलिकडच्या आठवड्यांत भारत आणि चीन यांनी सीमाभागात एक चांगले स्थान राखण्यासाठी डिप्लोमॅटिक आणि लष्करी माध्यमांद्वारे संपर्क साधला आहे.

निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की भारत-चीन सीमाभागातील द्विपक्षीय संबंधांच्या सर्वांगीण विकासासाठी दोन्ही पक्षांनी विविध द्विपक्षीय करारांनुसार सीमाभागातील शांतता पूर्वस्थितीवर आणण्याचे मान्य केले. शांतता असणे आवश्यक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा