भारत-चीन सीमा वादात अमेरिकेने घेतली उडी

यू एस, दि. २२ मे २०२०: चिनी सैन्याच्या भारतीय हद्दीत अतिक्रमण करण्याच्या प्रयत्नाविरूद्ध अमेरिकाही भारताच्या बाजूने सामील झाला आहे. गुरुवारी व्हाईट हाऊसने आपल्या अहवालात म्हटले आहे की चीन भारतासह सर्व शेजारी देशांमध्ये चिथावणीखोर लष्करी कारवाया करीत आहे. एक दिवस अगोदर अमेरिकन मुत्सद्दीनेही भारतीय सीमेवरील चीनच्या हस्तक्षेपाच्या विरोधात मोर्चा उघडला होता आणि त्याला संपूर्ण जगासाठी धोका असल्याचे म्हटले होते.

व्हाईट हाऊसने आपल्या अहवालात म्हटले आहे की, बीजिंग आपल्या तत्त्वांचे उल्लंघन करीत आहे आणि यलो सी, पूर्व आणि दक्षिण चीन समुद्र, तैवान सामुद्रधुनी आणि भारत-चीन सीमेवर विवादास्पद गतिविधि करत आहे. यामुळे चीन आपले इतर देशांच्या प्रती असलेले उत्तरदायित्वाला इजा पोहोचवत आहे.

‘युनायटेड स्टेट्स स्ट्रॅटेजिक अ‍ॅप्रोच टू पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ या नावाचा अहवाल अमेरिकन काँग्रेसला सादर करण्यात आला आहे. या अहवालात अमेरिकी सरकारचे चीनसंदर्भातील धोरण निश्चित केले गेले आहे. या अहवालात असे म्हटले आहे की जगभरात चीनची सामर्थ्यपूर्ण उद्दीष्टे आणि हितसंबंध यांना कोणत्याही प्रकारचा धोका जाणवल्यास तो दूर करण्याच्या प्रयत्नात चीनची ताकद वाढली आहे आणि त्याचबरोबर शक्तीचा वापरही वाढला आहे.

चीनमधील नेतेमंडळी असे म्हणत आहे की ते सैन्य बाळाचा वापर करत नाही, परंतू वाईट हाऊस मधील अहवालात असे म्हटले आहे की बीजिंगच्या हालचाली हे स्पष्ट करतात की चीन काय करण्याचा प्रयत्न करत आहे.

तत्पूर्वी, ट्रम्प प्रशासनाच्या सर्वोच्च मुत्सद्दीनेदेखील चिनी अतिक्रमणाविरूद्ध भारताच्या प्रतिकाराचे समर्थन केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण व पश्चिम आशियातील प्रमुख कार्यवाह एलिस वेल्स म्हणाल्या, “तुम्ही जर दक्षिण चीन समुद्राकडे पाहिले तर चीन सातत्याने आपली जागा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. सैन्य बळाच्या जोरावर चीन सर्वत्र अतिक्रण करत आहे.

वेल्स म्हणाले होते की, ज्यांना चीनच्या अतिक्रमणावर विश्वास नसेल त्यांनी भारताशी बोलावे, भारत याविषयी सांगू शकेल की कशा प्रकारे चिनी सैन्य सीमेवर वाद घालण्याचा प्रयत्न करत आहे. भारत आणि चीन यांच्या सीमेवरील होत असणार्‍या घटना हे दर्शवत आहेत की चीन करत असलेलीे अतिक्रमणाची कारवाई खरी आहे. चीन इतर देशांच्या सीमांमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. चीन सातत्याने तणाव वाढणाऱ्या क्रिया करत आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की चीन आपल्या वाढलेल्या ताकदीचा अतिक्रमण करण्यासाठीचा वापर प्रयत्न करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा