भारत-चीन सीमेवर भारताकडून हवाई पट्टीचे काम सुरू

लडाख, दि. ४ जून २०२०: लडाख प्रदेशात गेल्या एक महिन्यापासून भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. हा विषय निकाली काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. पण, भारताला यामध्ये कोणत्याही प्रकारची ढील द्यायची नाही, त्यामुळे सर्व प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भारत तयार आहे. बोफोर्स तोफखान्याच्या बंदोबस्ताबरोबरच लडाखजवळ (एलएसी) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील हवाई पट्टी बांधण्याच्या कामांना भारताने वेग दिला आहे.

येथील अनंतनागजवळील एनएच -४४ वर आपत्कालीन हवाई पट्टी बांधली जात आहे. जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लढाऊ विमाने किंवा इतर विमान उतरवता येतील.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की एलएसी जवळ चीनने अनेक प्रकारची निर्मिती कामे केली आहे आणि अनेक प्रकारच्या शस्त्रांचा पुरवठा वाढविला आहे. चीनने सीमा भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे बांधकाम केले आहे तसेच रेल्वे मार्ग देखील विकसित केले आहेत. तर दुसरीकडे भारताच्या बाजूने सुमारे ६० बोफोर्स तोफा लडाखजवळ पाठविली जात आहेत. भारतीय लष्कराने असे म्हटले आहे की त्यांना चीनबरोबरचा वाद मिटवायचा आहे, परंतु कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जाण्याची त्यांची तयारी आहे. यासाठी भारताने देखील सीमे लगताच्या भागांमध्ये रस्ते बांधणी सुरू केली आहे. याच कारणामुळे भारत आणि नेपाळमध्ये सुद्धा वाद निर्माण झाले आहेत.

दक्षिण काश्मीरमधील बिजबेहरा परिसराजवळ एनएच -४४ वर हवाई दलाची हवाई पट्टी बांधण्यात येत आहे, ज्याची लांबी सुमारे ३ किमी आहे. चीनमधील सुरू असलेल्या तणावामुळे या पट्टीचे बांधकाम दोन दिवसांपूर्वी सुरू झाले आहे, जे युद्धपातळीवर सुरू आहे. लॉकडाऊन अजूनही सुरू आहे, परंतू जिल्हा प्रशासनाने तातडीने या बांधकामा संबंधित सर्व परवानग्या दिल्या आहेत .

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारत आणि चिनी सैन्य लडाख मध्ये तैनात आहे. लडाख जवळ भारत आणि चिनी सैन्यामध्ये विवाद निर्माण झाल्यानंतर चीनने आपले बांधकाम कार्य वेगाने सुरू केले तथापि, यादरम्यान दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या असून नुकत्याच झालेल्या वाटाघाटीचा पहिला टप्पा पार पडला.

दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या वाटाघाटी नंतर गुरुवारी चिनी सैन्य दोन किलोमीटर मागे सरकले. ६ जून ला पुन्हा एकदा दोन्ही सैन्यांमध्ये चर्चा होणार आहे त्यापूर्वी ही एक चांगली घटना घडली आहे असे मानले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा